Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download – The PDF copy of Gram Panchayat Act 1958 in Marathi is given below for downloading. The candidates looking for this Act PDF Copy can download this copy of document for your reference. This PDF is published by government, so can download the document for free. This Document cover all information about Panchayat Samiti, Zilla Parishad, Gramin Shasan, Gram Panchayat & other details. Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download Link is given for your refrence.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – १९५८ आणि त्यातील सुधारणा , Maharashtra Gram Panchayat Act, 1958 in Marathi pdf – मित्रांनो आपल्याला माहीतच असेल कि आपल्या भारतात, समाजाचे नियमन करण्यात स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांसोबत, फेडरल सरकार आणि राज्य सरकार देखील सामाजिक नियमनाच्या कामात सहभागी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असे वर्गीकरण केले जाते. तर मित्रानो, या लेखात ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल जाणून घेऊया. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना एकत्रितपणे ‘पंचायती राज्य व्यवस्था’ असे म्हणतात. या संदर्भातील पूर्ण नवीन माहिती आणि यात झालेले विविध बदल आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत.
WhatsApp Group Join Instagram Join Now Telegram Group Join Nowग्रामपंचायत हि संस्था गावाचा कारभार आणि विविध विकास योजना राबवित असेल, याचा उद्देश म्हणजे गावाचा सर्वागीण विकास होय. या स्थानिक संस्थेला ग्रामपंचायत असे म्हणतात. याच समितीला ग्रामसभेची कार्यकारी समिती असे सुद्धा म्हणतात. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने या समितीचा पूर्ण कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीचा कारभार मुबंई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये चालतो. तसेच मित्रानो, नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी कमीत कमी ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
Number of Gram panchayat Sabhasad is depend on the populations of village. The Details about this are given below. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतीच्या सभासदची संख्या खालील प्रमाणे ठरवली जाते. १) 600 ते 1500 – 7 सभासद
२) 1501 ते 3000 – 9 सभासद ३) 3001 ते 4500 – 11 सभासद ४) 4501 ते 6000 – 13 सभासद ५) 6001 ते 7500 – 15 सभासद ६) 7501 त्यापेक्षा जास्त – 17 सभासद